AUS’s Likely Playing XI for 1st ODI vs IND: टीम इंडियाविरुद्ध असा असेल ऑस्ट्रेलियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळू शकते स्थान
ऑस्ट्रेलिया 17 नोव्हेंबरपासून देशात भारताचे यजमानपद भूषविणार आहे. मार्च महिन्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. पहिल्या सामन्यापासून ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील ज्यासाठी ते मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडतील. पाहा भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन.
IND vs AUS 2020 1st ODI Likely Playing XI: ऑस्ट्रेलिया (Australia) 17 नोव्हेंबरपासून देशात भारताचे यजमानपद भूषविणार आहे. मार्च महिन्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिला सामना 27 नोव्हेंबर 2020 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाईल. स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner), एका वर्षाच्या बंदीनंतर पहिल्यांदा भारताविरुद्ध मालिका खेळताना दिसतील. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) शानदार विजय मिळवला होता, पण यंदा त्यांच्यासमोर वेगळे आव्हान असेल. अलीकडेच संपुष्टात आलेल्या आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांतील बहुतेक खेळाडू खेळले, याचा अर्थ की ते सामना खेळण्याच्या तयारीत असतील जे लॉकडाऊननंतर पुन्हा क्रिकेट पुन्हा सुरू झाल्या नंतरचा मुद्दा बनला आहे. या मालिकेद्वारे लॉकडाउननंतर स्टेडियमच्या आत मर्यादित संख्येने चाहत्यांची पुनरागमन देखील होणार आहे. पहिल्या सामन्यापासून ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील ज्यासाठी ते मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडतील. (IND vs AUS 1st ODI Likely Playing XI: शिखर धवनसह मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी कोणता फलंदाज येणार सलामीला? पाहा कसा असेल टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन)
डेविड वॉर्नर आणि आरोन फिंचची जोडी सलामीला येतील. जानेवारी 2020 महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावर दोन्ही फलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली होती. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फलंदाजी करतील. अॅलेक्स कॅरी विकेटकीपरची भूमिका बजावेल. मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोन ऑल-राऊंडर संघात असतील. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड हे वेगवान गोलंदाज असतील तर अॅडम झांपा प्राथमिक फिरकीपटू म्हणून संघात राहील. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संघ तब्ब्ल नऊ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरेल, तर ऑस्ट्रेलिया संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता.
पाहा भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन
डेविड वॉर्नर, आरोन फिंच (कॅप्टन), स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि अॅडम झांपा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)