IPL Auction 2025 Live

Australia Women vs New Zealand Women, 10th Match Pitch Report: शारजाहच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज ठरणार वरचढ? खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थिती जाणून घ्या

उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यासाठी खेळपट्टी आणि हवामान परिस्थिती जाणून घेऊयात.

AUS vs NZ (Photo: @AusWomenCricket/@T20WorldCup)

Australia Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 10th Match 2024 ICC Womens T20 World Cup Pitch Report: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 10वा सामना ऑस्ट्रेलिया महिला संघ(AUS vs NZ) विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आज म्हणजेच 8 ऑक्टोबरला होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्वचषकातील (ICC Womens T20 World Cup)आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आणि पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय नोंदविण्याकडे न्यूझीलंडचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: Australia Women vs New Zealand Women T20 Head To Head Record: ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? आजच्या सामन्यात कोणाचे असेल वर्चस्व; येथे पहा हेड टू हेड आकडेवारी)

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी

टी 20 मध्ये दोन्ही संघ 52 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 28 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 21 वेळा विजय मिळवला आहे. 2006 मध्ये खेळलेला त्यांचा पहिला सामना अनिर्णित राहिला.

खेळपट्टीचा अहवाल

शारजाह क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या मैदानावर फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणे घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र सीमारेषा लहान असल्याने त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतात. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 135 धावांची आहे. येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असू शकतो.

हवामान अहवाल

शारजाहच्या हवामान अंदाजानुसार, पावसाची थोडीफार शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, सामन्यादरम्यान संध्याकाळी सूर्यप्रकाश येण्याची शक्यता आहे. Accuweather च्या मते, शारजाहमध्ये संध्याकाळसाठी परिस्थिती अनुकूल आहे आणि तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया महिला संघ: ॲलिसा हिली (सी/विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (सी), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन.