Australia Beat Pakistan, 3rd T20I Scorecard: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, PAK ला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बाबर आझमने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार मारले. बाबर आझमशिवाय हसिबुल्ला खानने 28 धावा केल्या.

Australia Beat Pakistan, 3rd T20I Scorecard: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, PAK ला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd T20I Match 2024 Scorecard:   ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series)  तिसरा सामना आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील  (Hobart)  बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर (Bellerive Oval Stadium) खेळला गेला. तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) पाकिस्तान (Pakistan) संघाचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या  (Josh Inglis)  खांद्यावर होती. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे (Mohammad Rizwan)  होते.  (हेही वाचा  -  Border Gavaskar Trophy New Milestone: 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, मालिकेत होऊ शकतात हे मोठे विक्रम)

पाहा पोस्ट  -

तत्पूर्वी, तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 17 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 18.1 षटकात केवळ 117 धावांवरच गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बाबर आझमने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार मारले. बाबर आझमशिवाय हसिबुल्ला खानने 28 धावा केल्या.

स्पेन्सर जॉन्सनने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून ॲरॉन हार्डीने सर्वाधिक तीन बळी घेतले. ॲरॉन हार्डीशिवाय स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 118 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 11.2 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉइनिसने नाबाद 61 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान मार्कस स्टॉइनिसने अवघ्या 27 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकार ठोकले. मार्कस स्टॉइनिसशिवाय जोश इंग्लिसने 27 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, जहांदाद खान आणि अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.3

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2024 05:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).