AUS-W vs IND-W 1st T20I: भारतासाठी पाऊस ठरला खलनायक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना रद्द; Jemimah Rodrigues ची रेकॉर्ड-ब्रेक खेळी व्यर्थ

पावसामुळे खेळ थांबवण्यापूर्वी जेमिमाह रॉड्रिग्सने रेकॉर्ड-ब्रेक खेळी केली. 21 वर्षे आणि 32 दिवसात जेमिमाह रॉड्रिग्स टी-20 मध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा सर्वात युवा खेळाडू बनली आहे. तिने वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरला मागे टाकले.

जेमिमाह रॉड्रिग्ज (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत महिला (India Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्याची अखेर घोषणा करण्यात आली आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने (Indian Team) फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर 15.2 षटकांत 4 बाद 131 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) नाबाद 49 आणि रिचा घोष 17 धावा खेळत होती. पहिला सामना पावसामुळे थांबला होता. स्मृती मंधानाने 10 चेंडूत 17 धावा केल्या. तसेच शेफालीने 18 धावा आणि दुखापतीनंतर परतणाऱ्या हरमनप्रीत कौनने चांगली सुरुवात केली आणि तीन चौकार लगावले. पण नंतर ती LBW बाद झाली. या दरम्यान जेमिमाहने रेकॉर्ड-ब्रेक खेळी केली. 21 वर्षे आणि 32 दिवसात जेमिमाह टी-20 मध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा सर्वात युवा खेळाडू बनली आहे. तिने वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरला मागे टाकले जिने 21 वर्षे आणि 111 दिवसांत सर्वात लहान होती जेव्हा तिने हा आकडा पार केला.

दरम्यान मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यानंतर 1000 पेक्षा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावांच्या क्लबमध्ये प्रवेश करणारी रॉड्रिग्स चौथी भारतीय आहे. तसेच ती मिताली राजनंतर दुसरी वेगवान भारतीय आहे. राजने फक्त 40 डावांमध्ये हजार धावांचा पल्ला गाठला होता तर जेमिमाहने तिच्या 48 व्या टी-20 मध्ये ही कमाल केली आहे. 10 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिमाने चौकार लगावला. यासह तिचा स्कोअर 21 झाला आणि त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये आपले 1000 धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे तर क्वीन्सलँडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 15.2 षटकांत 131 धावा केल्या होत्या. यानंतर पहिला सामना पावसामुळे थांबला आणि नंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

जेमिमाह ऑस्ट्रेलियात वनडे मालिका गमावणाऱ्या भारतीय संघात नव्हती, परंतु नुकत्याच झालेल्या 'द हंड्रेड' मालिकेत तिने नॉर्दर्न सुपरचार्जर्ससाठी चमकदार कामगिरी केली आणि सात सामन्यांत 249 धावा केल्या. या टी-20 मालिकेनंतर जेमिमाह आगामी महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार आहे. 21 वर्षीय जेमिमाहचा लीगमधील हा पहिला हंगाम असेल. 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या लीगमध्ये शेफाली वर्मा आणि राधा यादव सिडनी सिक्सर्सकडून खेळतील.