AFG vs HKG Live Streaming: आशिया कप 2025 चा आजपासून श्रीगणेशा; पहिला सामना अफगाणिस्तान-हाँगकाँग यांच्यात, थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?
यंदाची आशिया कप स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर नजर टाकल्यास, अफगाणिस्तानचे पारडे हाँगकाँगवर जड आहे.
Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या थराराला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गट 'बी' मधील अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबू धाबी येथे खेळला जाईल. दोन्ही संघ विजयाने आपल्या आशिया कप अभियानाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. हा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता खेळवला जाईल. या सामन्याची संभाव्य प्लेइंग-11, हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि थेट प्रक्षेपणाची माहिती खालीलप्रमाणे आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2025 मध्ये भारत-पाकिस्तानचे दिग्गज एकत्र! जाणून घ्या समालोचन पॅनलमध्ये कोणत्या पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश)
हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड
यंदाची आशिया कप स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर नजर टाकल्यास, अफगाणिस्तानचे पारडे हाँगकाँगवर जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 टी-20 सामने झाले आहेत, ज्यापैकी अफगाणिस्तानने 3 तर हाँगकाँगने 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे यासिन मुर्तझाच्या नेतृत्वाखालील हाँगकाँगचा संघ रशीद खानच्या संघाविरुद्ध आपला रेकॉर्ड सुधारण्यासाठी मैदानात उतरेल.
उत्कृष्ट सुरुवातीसाठी हाँगकाँग उत्सुक
मागील स्पर्धेत (2023) सहभागी नसलेला हाँगकाँगचा संघ या वेळी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. संघाच्या शीर्षस्थानी असलेल्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. बाबर हयात आणि अंशुमान रथ यांना चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. मधल्या फळीत अनुभवी किंचित शाह संघाचा कणा असेल, त्याला मार्टिन कोएत्झी आणि जीशान अली यांसारख्या खेळाडूंची साथ मिळेल. गोलंदाजी विभागात, कर्णधार यासिन मुर्तझासोबत निजाकत खान आणि अहसान खान फिरकीची जबाबदारी सांभाळतील, तर मोहम्मद वाहिद एकमेव वेगवान गोलंदाज असेल.
अफगाणिस्तान विजयाने सुरुवात करण्यास सज्ज
रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा संघ विजयाने स्पर्धेची सुरुवात करू इच्छितो. नुकत्याच संपलेल्या त्रिकोणीय मालिकेत संघाची कामगिरी चांगली होती. अफगाणिस्तानसाठी रेहमानुल्ला गुरबाज आणि सेदिकुल्ला अटल डावाची सुरुवात करतील. त्यांच्याकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत इब्राहिम झाद्रान, अझमतुल्ला उमरझाई, करीम जन्नत आणि डार्विश रसूली खेळताना दिसतील. हे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजी नेहमीप्रमाणे फिरकीवर अवलंबून असेल. रशीद खान, नूर अहमद, मुजीब उर रेहमान आणि मोहम्मद नबी हे मुख्य फिरकीपटू असतील, तर फझलहक फारुकी एकमेव वेगवान गोलंदाज असेल.
लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती
आशिया कपचे सर्व सामने Sony LIV ॲपवर लाइव्ह पाहता येतील. तसेच, टीव्हीवर पाहण्यासाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेल्सवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग संघ
अफगाणिस्तान : रशीद खान (कर्णधार), दरविश रसूली, इब्राहिम जद्रान, सेदीकुल्लाह अटल, गुलबदीन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, करीम जनात, मोहम्मद नबी, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), एएम गझनफर, अहमद मलिक, फरेद, फरेद, मुहम्मद, मुहम्मद नबी. उर रहमान, नवीन-उल-हक.
हाँगकाँग : यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, मार्टिन कोएत्झी, कल्हन चालू, अनस खान, किंचित शाह, निझाकत खान, एजाज खान, अंशुमन रथ (यष्टीरक्षक), झीशान अली (यष्टीरक्षक), शाहिद वासीफ (यष्टीरक्षक), नसरुल्लाह, मोहम्मद इक्बाल राणा, मोहम्मद अली, इक्बाल राणा, मोहम्मद हयात. आयुष शुक्ला, हारून अर्शद, मोहम्मद गझनफर, एहसान खान.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)