Ashes 2019: ऑस्ट्रेलिया- इंग्लंड पहिल्या सामन्यात कांगारूंचा जोरदार विजय, 251 धावांनी इंग्लंडचा पराभव
यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 251 धावांनी विजय मिळवला आहे.
इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघामधील प्रतिष्ठेची मानली जाणली अॅशेस (Ashes) मालिका 1 ऑगस्ट पासून सुरु झाली, आज म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी बर्मिंघमच्या एजबॅस्टन (Edgbaston) क्रिकेट मैदानावर या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 251 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि मैथ्यु वेड यांनी शानदार शतकी खेळी करत इंग्लंडच्या संघाला 398 धावांचे आवाहन दिले होते. मात्र इंग्लंडचा अक्खा संघ अवघ्या 146 धावांमध्येच तंबूत परतला.यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायन याने 6 तर पैट कमिंस ने 4 विकेट घेत इंग्लंडच्या संघाचा धुव्वा उडवला.
दरम्यान, मार्च 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या तिघांवर विरुद्ध चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी बंदी घालण्यात आली होती. तरीही इंग्लंड विरुद्ध पहिल्या अॅशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया संघात या तिघांचा समावेश करण्यात आला होता . यावेळी आपल्या दमदार खेळीने स्टीव्ह स्मिथने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.स्टीव्हने पहिल्या इनिंग मध्ये 144 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 142 धावा काढून संघाला विजयाच्या दिशेने नेले तर दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा खेळलेल्या मैथ्युने 110 धावांची उत्तम खेळी केली. Ashes 2019: बॉल टेंपरिंगच्या मालिकेनंतर टीम पेन याच्या Hand Shake परंपरेवर जो रूट आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस निराश
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड मधील ही अशेज सिरीज अत्यंत महत्वाची मी,आणली जाती, आजच्या सामन्यात पराभव झालेल्या इंग्लंडला येत्या 14 ऑगस्ट पासून आपला खेळ दाखवत सीरिजमध्ये पुन्हा अस्तित्व दाखवण्याची संधी मिळणार आहे.