Virat Kohli Anushka Sharma: आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माला आनंद आनावर; विराट कोहलीला मिठी मारली (Video)
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. या विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Virat Kohli Anushka Sharma: आयपीएल 2025 चा अंतिम सामना मंगळवारी रात्री उशिरा झाला. ज्यामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून जेतेपद जिंकले. आरसीबीने पंजाब किंग्जला हरवून हा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने संघ आणि चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. नेहमीप्रमाणे, अनुष्का शर्मा तिचा पती विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली.
आरसीबीने अंतिम सामन्यात विजय मिळवताच, अनुष्काच्या आनंदाला सीमा नव्हती. ती विराटला मिठी मारण्यासाठी मैदानावर धावली. हा भावनिक क्षण दोघांसाठीही खूप खास होता आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 जून 2025 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आरसीबीने 6 धावांनी विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने आणि अनुष्का शर्मा दोघेही भावूक दिसले. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि तिच्या भावनिक प्रतिक्रियेने चाहत्यांची मने जिंकली.
Everyone is looking at him and he's just looking at her embracing his world in his arms🥹🧿❤️#ViratKohli #anushkasharma #virushka pic.twitter.com/aeuRptxE35
— s (@yaayerhs) June 3, 2025
अनुष्का 2014 पासून आरसीबीला पाठिंबा देत आहे. तिच्यासाठीही हा 11 वर्षांचा प्रवास आहे. ती प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये होती. आम्हाला हरताना पाहिले, विजयातही उपस्थित आहे. जीवनसाथी तुमच्यासाठी काय करतो - त्याचे समर्पण, त्याग आणि प्रत्येक क्षणी पाठिंबा - हे शब्दात वर्णन करता येणार नाही, असे तो यवेळी म्हणाला. अनुष्काने त्याच्या चढ-उतारांच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक आधार दिला. विराट पुढे म्हणाला, अनुष्काने प्रत्येक अडचणीत मला साथ दिली. हा विजय तिच्यासाठीही खास आहे.
आरसीबीने विजय मिळवताच ती आनंदाने उडी मारली आणि टाळ्या वाजवताना दिसली. विराट भावुक झाल्यावर ती त्याला मिठी मारताना आणि आनंद साजरा करताना दिसली. चाहते अनुष्काला 'आरसीबीचा लकी चार्म' म्हणात आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

