Rishabh Pant नाही तर आंध्र प्रदेशचा श्रीकर भरत बानू शकतो एम एस धोनीचा वास्तविक उत्तराधिकारी, एम एस के प्रसाद ने दिले टेस्ट डेब्यूचे संकेत

आणि तो एम एस धोनीचा वास्तविक उत्तराधिकारी देखील बानू शकतो.

के एस भरत आणि रिषभ पंत (Photo Credit/ Instagram/ Getty Images)

भारतीय संघा (Indian Team) च्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी रविवारी एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) निवड समितीने टी-20, वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा केली. विंडीज दौऱ्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) च कर्णधार असल्याचे पक्क झाले तर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने या दौऱ्यामधून माघार घेतल्याने युवा क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) याची पहिला विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली. पंतला भविष्यासाठी तयार करण्याच्या हेतूने त्याची निवड करण्यात आल्याचे प्रसाद म्हणाले. (एम एस धोनी घेणार पॅराशूट रेजिमेंट सोबत ट्रेनिंग, आर्मी प्रमुख बिपीन रावत यांनी दाखवला हिरवा कंदील, जाणून घ्या सविस्तर)

निवड समितीने धोनीनंतर त्याची जागा कोण घेणार यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 38 वर्षांचा धोनी 2023 चा विश्वचषक खेळण्याची शक्यता कमी आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विकेटकिपर आणि फिनिशर अशा दोन्ही भुमिका बजावणारा खेळाडूची गरज आहे. सध्या, पंतला धोनीचा उत्तराधिकारी समजले जात आहे. पण भारतात असाही एक क्रिकेटपटू आहे जो चुपचाप क्रिकेट जगतात आपली छाप सोडत आहे. आणि निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी देखील त्याच्या खेळीची दरखल घेत त्याला लवकरच भारताच्या टेस्ट टीममध्ये स्थान मिळेल असे म्हटले आहे. तो क्रिकेटपटू आहे, आंध्र प्रदेशचा के एस भरत (KS Bharat) किंवा श्रीकर भरत (Srikar Bharat).

प्रसाद म्हणाले, "आम्ही भारत ए संघाच्या कामगिरीचा विचार केला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मनीष पांडे (Manish Pandeyy) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) याने सुद्धा. आणि मोठ्या क्रिकेट फॉर्ममध्ये (टेस्ट) के. एस भारत हा भारतीय संघात निवडून येण्याच्या अगदी जवळ होता."

भरत हा भारत ए संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळतो. त्याने मागील 11 सामन्यात 3 शतक आणि 2 अर्ध शतकाच्या साहाय्याने 686 धावा केल्या आहे. त्यासह त्याने 41 कॅच आणि सहा स्टंपिंग केले आहेत. दुसरीकडे, पंतची फलंदाजी संतोषकारक आहे पण विकेटकीपिंगमध्ये तो कमकुवत आहे. पण भरत या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट आहे. आणि म्हणून निवड समितीने भारताच्या कसोटी संघात पंतनंतर दुय्यम विकेटकीपर म्हणून भरातला समाविष्ट करू शकतो. आणि तो धोनीचा वास्तविक उत्तराधिकारी देखील बानू शकतो.