WTC Final 2025: अहमदाबाद विमान दुर्घनेने क्रिकेट विश्वात शोककळा; WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 11 जूनपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळली जात आहे. आज 13 जून सामन्याचा तिसरा दिवस आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत हाताला काळी पट्टी बांधून उतरले आहेत.

WTC Final 2025: अहमदाबाद विमान दुर्घनेने क्रिकेट विश्वात शोककळा; WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात
PC-X

WTC Final 2025: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनल (WTC Final 2025) सामन्यात आमनेसामने आहेत. काल 12 जून रोजी अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला. ज्यामध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अनेक लोक जखमी देखील झाले आहेत. या घटनेने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघाने (SA vs AUS) या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

13 जून हा सामन्याचा तिसरा दिवस आहे. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले. केवळ खेळाडूच नाही तर पंच देखील काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले आणि या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या या निर्णयाचे जगात कौतुक होत आहे.

ऑस्ट्रेलियाचे लक्ष दुसऱ्या जेतेपदावर

ऑस्ट्रेलियाचे डोळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये दुसऱ्या जेतेपदावर आहे. यापूर्वी, 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर, संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा अंतिम सामना खेळला जात आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारताला हरवून हे विजेतेपद जिंकले. आता, तिसरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे मनोरंजक असेल.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).