IPL 2020: अर्जुन तेंडुलकर ला यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात स्थान? जाणून घ्या एका फोटोमुळे सुरू झालेल्या तर्क-वितर्कांमागील सत्य!
तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर जाणून घ्या अर्जुनची नेमकी मुंबई इंडियंस सोबत जबाबदारी काय आहे?
मागील सहा महिन्यांपासून जगावर घोंघावणार्या कोरोना व्हायरस संकटाचा फटका क्रिकेट विश्वालाही बसला अअहे. दरम्यान यंदाची आयपीएल 2020 ची स्पर्धादेखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा भारताऐवजी युएई मध्ये त्याच आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणारे भारतीय क्रिकेटपटू काही दिवसांपूर्वीच युएईमध्ये दाखल झाले आहेत. त्यात सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश आहे. मात्र अर्जुन नेमका युएईमध्ये काय करतोय? त्याचा देखील मुंबई इंडियंस संघामध्ये समावेश झाला आहे का? असे प्रश्न नेटकर्यांना पडला आहे. तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर जाणून घ्या अर्जुनची नेमकी मुंबई इंडियंस सोबत जबाबदारी काय आहे?
दरम्यान युएईमध्ये भारतीय क्रिकेटर्स दाखल झाल्यानंतर त्यांची प्रॅक्टीस सुरू झाली आहे. अशातच मुंबई ईंडियंस टीमसोबत अर्जुन तेंडुलकर स्वीमिंग पुलमध्ये असलेला फोटो व्हायरल झाला आहे. पण हा फोटो पाहून अनेकांना असं वाटलं की अर्जुनचा मुंबई इंडियंस संघातून यंदा आयपीएलमध्ये प्रवेश करतोय की काय? पण जरा थांबा ... अर्जुन मुंबई इंडियंसमध्ये खेळाडू म्हणून नव्हे तर केवळ नेट बॉलर म्हणून सहभागी झाला आहे. IPL 2020: ट्विटरने लॉन्च केले आयपीएल टीमचे Emojis; पहा इमोजी वापरुन कसा कराल आवडत्या संघाला सपोर्ट.
प्रत्येक संघासोबत त्यांचे काही नेट बॉलर असतात. दरम्यान टीमला नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी त्यांना ठेवलं जातं. अर्जुन देखील अशाच एका नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडत आहे.
यंदाच्या आयपीएलची सुरूवात 19 सप्टेंबर पासून होत आहे. पहिला सामना
गतविजेता संघ मुंबई इंडियंस हा गतविजेता असल्याने तो चैन्नई सुपरकिंग्स सोबत पहिला सामना खेळणार आहे.
सचिन तेंडुलकर हा आयपीएलमध्ये मागील काही सीझन मुंबई इंडियंस संघासोबत खेळला आहे. त्यानंतर मेटॉंर म्हणून काम करत आहे.