IND vs AUS 4th Test: शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेल्या लॉकेटला केले किस, जाणून घ्या याचे मोठे रहस्य

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 75 शतकेही पूर्ण झाली असून शतकांच्या बाबतीत विराट आता फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेल्या लॉकेटचे चुंबनही घेतले.

IND vs AUS 4th Test: शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेल्या लॉकेटला केले किस, जाणून घ्या याचे मोठे रहस्य
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर कसोटी क्रिकेटमधील आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला आहे. त्याने 3 वर्षांनी कसोटीत शानदार शतक झळकावले. या शतकासह विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 75 शतकेही पूर्ण झाली असून शतकांच्या बाबतीत विराट आता फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेल्या लॉकेटचे चुंबनही घेतले. शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेल्या लॉकेटचे चुंबन घेतले, त्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराटने मोठी इनिंग खेळल्यानंतर याआधीही अनेकदा या लॉकेटचे चुंबन घेतले आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या या लॉकेटचे रहस्य काय आहे, ते त्याच्या हृदयाच्या इतके जवळ का आहे, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगत आहोत. (हे दखील वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहलीने दिग्गज लिटल मास्टरला मागे टाकत केली 'हा' मोठा विक्रम)

पहा व्हिडिओ

विराटच्या लॉकेटमध्ये लग्नाची आहे अंगठी

खरंतर, विराट कोहलीने गळ्यात घातलेलं लॉकेट म्हणजे त्याची लग्नाची अंगठी. विराट कोहलीने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. यापूर्वी दोघांची एंगेजमेंट झाली होती, त्यावेळी अनुष्काने विराट कोहलीला जी वेडिंग अंगठी घातली होती, तीच अंगठी विराटने लॉकेटमध्ये बदलली आहे. यामुळेच जेव्हा तो शतक झळकावतो किंवा मोठी इनिंग खेळतो तेव्हा तो या लॉकेट रिंगला किस करतो. कारण ते विरुष्काच्या प्रेमाचे लक्षण आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनाही विरुष्काच्या नावाने हाक मारली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2023 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).