BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यानंतर मुलगी Sana Ganguly कोविड-19 पॉझिटिव्ह
ती सध्या त्यांच्या निवासस्थानी क्वारंटाईन आहे आणि तिच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाही. मुलगी सनासह गांगुलीच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) मुलगी सना (Sana Ganguly) कोविड-19 पॉझिटिव्ह आढळली आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने त्यांच्या निवासस्थानी क्वारंटाईन केले असून तिच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तथापि, भारताच्या माजी कर्णधाराची पत्नी डोना हिचा व्हायरसचा अहवाल नकारात्मक आला आहे. सौरव गांगुली कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणीनंतर रुग्णालयातून घरी परतल्यानंतर काही दिवसांनी सना गांगुलीची कोरोना व्हायरसची सकारात्मक (Sana Ganguly COVID Positive) चाचणी आली आहे. गांगुली यांना डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची कोविड-19 च्या डेल्टा प्लस व्हेरियंट चाचणी सकारात्मक असल्याचे दिसून आले. त्यांना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली नसल्याच्या परिणामांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
49 वर्षीय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौम्य लक्षणांनी त्रस्त होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात बारीक नजर ठेवण्यात आली होती. गांगुलीला रुग्णालयात “मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल” थेरपी देण्यात आई. डिस्चार्ज करण्यापूर्वी त्यांची ऑक्सिजन संपृक्तता पातळी 99 टक्के स्थिर होती. गेल्या वर्षी गांगुली अनेक व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रवास करत होते. त्याचा मोठा भाऊ स्नेहशिष याचीही या वर्षाच्या सुरुवातीला कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
दरम्यान जानेवारीनंतर 2021 मध्ये गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी त्याला छातीत अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर दोनदा दाखल करण्यात आले होते. गांगुलीला त्याच्या कोलकाता येथील घरी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. 20 दिवसांनंतर गांगुलीच्या छातीत पुन्हा सारखेच दुखू लागले ज्यामुळे 28 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली. प्रक्रियेदरम्यान, दोन धमन्यांमध्ये दोन स्टेंट ठेवण्यात आले. गांगुलीने मार्चमध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली आणि स्वतःचे कोविड-19 विरुद्ध पूर्णपणे लसीकरण करून घेतले. त्याचा भाऊ स्नेहशिष गांगुली देखील या वर्षाच्या सुरुवातीला कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला होता.