Rashid Khan Wedding: अफगाणिस्तानाचा स्टार स्पिनर अडकला विवाह बंधनात, लग्नाचे फोटो होत आहे Viral

Photo Credit - Mohhamad Nabi

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने चाहत्यांना खूशखबर दिली आहे. आनंदाची बातमी म्हणजे त्यांचे लग्न झाले. व्हायरल झालेल्या फोटोंनुसार, हा विवाह सोहळा 03 ऑक्टोबर रोजी काबुल शहरात झाला, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. राशिद खानच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच सोशल मीडियावरही अभिनंदनाचा पूर येत आहे. काही वर्षापुर्वी या स्टार स्पिनरने एका मुलाखतीमध्ये आपला संघ जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही तो पर्यंत आपण लग्न करणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे आता त्यांने लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (हेही वाचा -  Rashid Khan Throws His Bat in Anger: करीम जनातने दुहेरी रन घेण्यास नकार देताच रशीद खान संतापला, रागातच मैदानात बॅट फेकली (Watch Video) )

पाहा राशिद खानच्या लग्नाचे फोटो  -

दरम्यान रशिद खानच्या लग्नात अफगाणिस्तानचे अनेक क्रिक्रेटपट्टू त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. याच प्रमाणे त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेक आजी माजी क्रिकेटपट्टूनी त्याला लग्नासाठी शुभेच्छा या दिल्या आहेत. बांगलादेशचा क्रिकेटपट्टू मोहम्मद नबीने देखील राशिद खानला लग्नाच्या शुभेच्छा या दिल्या असून त्याने या लग्नासाठी शुभेच्छा या दिल्या असून लग्नाचे फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

राशिदच्या लग्नाला अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणारे त्याचे सर्व सहकारी क्रिकेटपटू उपस्थित होते. या लग्नात संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी दिसला. याशिवाय अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाईही दिसला. रशीदच्या लग्नात नजीबुल्ला जद्रान, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान यांच्यासह अनेक स्टार्स दिसले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान देखील राशिदच्या लग्नाला उपस्थित होते.