AFG vs BAN 2nd ODI 2024 Toss Update: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे
Afghanistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd ODI 2024: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अफगाणिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत बांगलादेशला हरवून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या वनडेत उतरणार आहे. दुसरीकडे बांगलादेशची नजर दुसरी वनडे जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याकडे असेल. दरम्यान या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय हा घेतला आहे. (हेही वाचा - Afghanistan Beat Bangladesh, 1st ODI Match Scorecard: पहिल्या वनडेत अफगाणिस्तानने बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला, अल्लाह गझनफरने घेतल्या 6 विकेट, AFG ची मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी )
ही एकदिवसीय मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे ती आता फार दूर नाही. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर, अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पाहा दोन्ही संघातील खेळाडू -
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर, फजलहक फारुकी
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकिपर), मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान