Abu Dhabi T10 League: चालू सामन्यात UAE फील्डर जर्सी बदलत होता आणि फलंदाजाने लुटल्या चार धावा, टी-10 लीगमधील हा अजब प्रकार पाहून फुटेल हसू (Watch Video)
अबु धाबीमध्ये सुरू होणार्या टी-10 लीगमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे जो पाहून खेळाडूही दंग राहिले आणि त्यांना हसू फुटले. टीम अबू धाबी आणि नॉर्दर्न वॉरीर्स यांच्यातील टी-10 सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. नॉर्दर्न वॉरियर्सच्या डावादरम्यान ही मजेदार घटना घडली.
कधी कधी क्रिकेटच्या मैदानावर विचित्र आणि मजेदार घटना घडतात. जागतिक क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच लीग खेळला जात आहेत दररोज एक व्हिडिओ व्हायरल होतो. अबु धाबीमध्ये (Abu Dhabi) सुरू होणार्या टी-10 लीगमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे जो पाहून खेळाडूही दंग राहिले आणि त्यांना हसू फुटले. टीम अबू धाबी (Team Abu Dhabi) आणि नॉर्दन वॉरियर्स यांच्यातील टी-10 सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. टीम अबू धाबीने पहिले फलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 123 धावा केल्या. प्रत्युत्तरात वॉरियर्सने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 124 धावांचे लक्ष्य गाठून 8 विकेटने सामना जिंकला. पण विजय आणि पराभवाच्या या खेळामध्ये एक रंजक घटनाही घडली, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नॉर्दन वॉरियर्सच्या (Northern Warriors) डावादरम्यान ही मजेदार घटना घडली. (Big Bash League 2020-21: अरेरे! एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ)
तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम अबू धाबीच्या ओवर्टनच्या फुल-टॉस बॉलवर वॉरियर्सचा सलामी फलंदाज वसीम मुहम्मदने बॅकवर्ड पॉईंटवर शॉट मारला. डीप बॅकवर्ड पॉईंटवर उभा असलेला टीम अबू धाबीचा फील्डर रोहन मुस्तफा चेंडू रोखण्यासाठी सीमारेषेच्या दिशेने धावला, तेव्हाच खरचं काहीतरी वेगळे पाहायला मिळाले. फलंदाजीला असलेल्या वासिमने मारलेला चेंडू सीमारेषेपार जात असताना 32 वर्षीय फील्डर मुस्तफा मैदानात उघडपणे आपली जर्सी बदलताना दिसला. मुस्तफा चौकार रोखण्यासाठी धावला पण चेंडू पकडण्याऐवजी जर्सी बदलण्यावर त्याचे लक्ष केंद्रित असल्याने तो मधेच थांबला.अशाप्रकारे मुस्तफा जर्सी बदलत राहिला आणि फलंदाजाने चौकार लुटला. चालू सामन्यात मैदानावर मुस्तफाला असे कृत्य करताना पाहून विरोधी संघाचा कर्णधार निकोलस पूरन दंग राहिला आणि त्यालाही हसू फुटले. पहा हा मजेदार व्हिडिओ:
दरम्यान, या वॉरियर्सचा फलंदाज वसीम मुहम्मदने जवळपास 224 च्या स्ट्राईक रेटने 34 चेंडूत 76 धावा फटकावल्या. वसीमने एकूण 7 चौकार आणि 6 षटकार लागवले व संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)