Abu Dhabi T10 League: 19 वर्षीय कैस अहमद याने टाकला घातक बाउन्सर, थोडक्यात बचावले आंद्रे रसेल याचे डोके, पाहा व्हिडिओ

हा बाउन्सर इतका उत्कृष्ट होता की चेंडू त्याच्या डोक्याच्या अगदी जवळून गेला आणिरसेल जमिनीवर पडला. फिरकीपटू गोलंदाजी करत असल्याने रसेल हेल्मेटसुद्धा परिधान केले नव्हते.

(Photo Credit: Twitter)

अबुधाबीमध्ये सुरू असलेल्या टी 10 लीगमध्ये दररोज कधी न पाहिलेले दिसते. बुधवारीदेखील असाच एक आश्चर्यजनक घटना घटली जी पाहून सर्व खेळाडू आणि चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच बसला. टी 10 लीगच्या 17 व्या सामन्यात बंगाल टायगर्स (Bengal Tigers) कडून खेळणार्‍या अफगाणिस्तानचा फिरकीपटू कैस अहमद (Qais Ahmad) याने नॉर्थन वॉरियर्सचा (Northern Warriors) फलंदाज आंद्रे रसेल (Andre Russell) याला असा चेंडू फेकला की रसेल काही मिनिटं मैदानात क्रीजवर आडवा झाला. लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिजच्या रसेलला या अफगाण फिरकीपटू जागेवरच पाडले. कैसने रसेलला मोठे षटकार मारण्यापासून थांबवण्यासाठी बाउन्सर टाकला जो रसेलच्या अगदी डोक्याच्या जवळून गेला. वेगवान गोलंदाजांसाठी बाउन्सर एक महत्त्वपूर्ण शस्त्र असते आणि ते बहुतेकदा या प्रकारच्या चेंडूचा वापर करतात. पण, फिरकी गोलंदाजांनी बाउन्सर चेंडू फेकणे हे काही नवीन आहे. (T10 League 2019: वेस्ट इंडियन चाडविक वॉल्टन याची पंजाबी ऐकून युवराज सिंह याला झाले हसू अनावर, पाहा हा मजेदार Video)

नॉर्दन वॉरियर्सच्या डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये फिरकीपटू कैस गोलंदाजीला आला. तो रसेलला गोलंदाजी करत होता, जो मोठ्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याला रोखण्यासाठी कैसने ने गुगली किंवा लेग स्पिनऐवजी बाउन्सर चेंडूचा वापर केला. हा बाउन्सर इतका उत्कृष्ट होता की चेंडू त्याच्या डोक्याच्या अगदी जवळून गेला आणि रसेल जमिनीवर पडला. फिरकीपटू गोलंदाजी करत असल्याने रसेल हेल्मेटसुद्धा परिधान केले नव्हते, पण कैसची गोलंदाजी पाहता त्याने लगेच हेल्मेट मागवले. नंतर, कैसने रसेलची माफीही मागितली. कैसने रेसलला त्याच्या गोलंदाजीने परेशान केले तरी विंडीजच्या फलंदाजाने चांगली फलंदाजी करत 25 चेंडूत 41 धावा फटकावल्या.

पहिले फलंदाजी करत टायगर्सने 103 धावांचे लक्ष ठेवले होते. रसेलच्या या खेळीचा संघाला जास्त फायदा झाला नाही आणि वॉरिअर्सला 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कैसने 5 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत आणि ते ही अवघ्या 8.77 च्या इकॉनॉमी रेटने धावा. अन्य गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त आहे. अवघ्या 19 वर्षांच्या कैसने या स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी केली आहे.