AB de Villiers All-time IPL XI: एबी डिव्हिलियर्सच्या ऑल-टाइम आयपीएल XI मध्ये एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्माचा समावेश; 'हा' खेळाडू बनला कर्णधार

बंगळुरू फ्रेंचायझीयामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या डिव्हिलियर्सनेही आपला कर्णधार आणि स्वत:ला इलेव्हनमध्ये निवडले.

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) आपली सर्वकालिक इंडियन प्रीमियर लीग (IPL) इलेव्हनची निवड केली आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) कर्णधार म्हणून निवडले. बंगळुरू फ्रेंचायझीयामध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळणाऱ्या डिव्हिलियर्सनेही आपला कर्णधार आणि स्वत:ला इलेव्हनमध्ये निवडले. आयपीएलमध्ये कारकिर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून करणाऱ्या डिव्हिलियर्सने आरसीबीमध्ये (RCB) कोहलीबरोबर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात प्रशंसनीय भागीदारी केली. दोन्ही खेळाडू बऱ्याच वर्षांपासून आरसीबीच्या कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरले आणि 2016 मध्ये संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. डीव्हिलियर्सने आपला माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागला रोहित शर्मासह (Rohit Sharma) सलामी फलंदाज म्हणून निवडले. रोहित गेल्या पाच वर्षांत जगातला सर्वोत्कृष्ट खेळ खेळत आहे असे वर्णन डीव्हिलियर्सने केले. (IPL 2008 लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने विराट कोहलीला का खरेदी केले नाही? आयपीएलचे माजी COO ने सांगितले कारण)

तिसऱ्या स्थानावर विराट, चौथ्यावर डीव्हिलियर्स खुद्द आहे, तर पाचव्या स्थानावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे, जो पहिल्यांदाच कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला 3 आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा धोनी डीव्हिलियर्सच्या अष्टपैलू इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर सीएसकेचा सहकारी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सातवा क्रमांक पटकावला आहे. गोलंदाजांमध्ये जडेजासह रशीद खान फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळत आहे, तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा डीव्हिलियर्सच्या ऑल-टाइम इलेव्हनमधील 3 वेगवान गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे, डिव्हिलियर्सने विराट आणि रोहितच्या पुढे धोनीची कर्णधार म्हणूनही निवड केली आहे.

एबी डिव्हिलियर्सचा आयपीएल इलेव्हन: एमएस धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह.