अबब! माजी भारतीय क्रिकेटपटूने केला खुलासा; Team India खेळाडूंना शतक, द्विशक आणि 5 विकेट घेतल्यानंतर मिळतो ‘इतका’ बोनस

भारतीय खेळाडू जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी आहेत. एका भारतीय खेळाडूला कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये निश्चित मॅच फी मिळते.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारतीय संघातील (Indian Team) खेळाडूंना करारानुसार कोट्यावधी रुपयेच मिळतात, परंतु त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना बोनस म्हणून लाखो रुपये मिळतात याचा खुलासा माजी भारतीय खेळाडू आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी केला आहे. भारतीय खेळाडू (Indian Cricketers) जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी आहेत. ग्रेड A+ करारातील भारतीय खेळाडूला वर्षासाठी 7 कोटी रुपये मिळतात तर ग्रेड A मधील खेळाडूंना वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. एका भारतीय खेळाडूला कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये निश्चित मॅच फी मिळते. एकदिवसीय सामन्यात खेळाडूला 6 लाख तर प्रत्येक टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. ज्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना मॅच फीच्या 50% पैसे मिळतात. ही आकडेवारी सार्वजनिक क्षेत्रात जगजाहीर असली तरी भारतीय कसोटी क्रिकेटपटूला बक्षीस म्हणून 'बोनस' मिळत असल्याचे चाहत्यांना कमीच माहित असेल. (Highest Paid Cricket Captains: बाबो! विराट कोहली नव्हे या देशाचा कर्णधार घेतो सर्वाधिक पगार, बाबर आजम लाखात खेळतो)

भारताचे माजी सलामीवीर चोपडा यांनी बुधवारी बोनस पैशांविषयी काही मनोरंजक माहिती उघड केली. आपल्या YouTube चॅनलवर बोलताना चोपडा यांनी रहस्य उघडले की एखाद्या खेळाडूला दुहेरी शतक ठोकल्यास 7 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते. जर फलंदाजाने शतक ठोकले तर त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते तर एखाद्या गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या तर त्याला 5 लाख रुपयांचा बोनस दिला जातो. ही रक्कम मॅच फी म्हणून मोजली जात नाही. विशेष म्हणजे ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआय (BCCI) रोख बोनस देखील देते. या वर्षाच्या सुरूवातीला, बोर्ड-गावस्कर ट्रॉफी 2020/21 मध्ये ऐतिहासिक विजयानंतर भारतीय बोर्डाने प्रत्येक खेळाडूसाठी 5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला होता. चोपडा यांच्या म्हणण्यानुसार, यंदा इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात शतकासह 8 विकेट्स घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनला केवळ एका कसोटी सामन्यात 25 लाख रुपये मिळाले असतील, कारण कसोटी खेळण्याची त्याची मॅच फी 15 लाख रुपये आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक विश्व कसोटी चँपियनशिपच्या फायनल संन्यासोबत टीम इंडिया 2021/22 आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात करेल. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ यजमान इंग्लंड विरोधात 5 कसोटी सामने खेळणार आहे.