Chief Selector Salary: मुख्य निवडकर्त्याला आधी मिळायचे 1 कोटी, अजित आगरकरला मिळणार एवढे; पगारात बंपर वाढ
यापूर्वी मुख्य निवडकर्त्याला वर्षाला 1 कोटी पगार मिळत होता. माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्माला तेवढाच पगार मिळत होता, पण अजित आगरकरला वर्षाला 3 कोटी मिळणार आहेत.
माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना नवे मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. आगरकर हे पद सांभाळण्याच्या कामात व्यस्त आहेत. आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची निवड केली. दरम्यान, क्रिकेट वेबसाईट क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, मुख्य निवडकर्ता आगरकरला वार्षिक 1 कोटींऐवजी 3 कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी मुख्य निवडकर्त्याला वर्षाला 1 कोटी पगार मिळत होता. माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्माला तेवढाच पगार मिळत होता, पण अजित आगरकरला वर्षाला 3 कोटी मिळणार आहेत. त्याच वेळी, इतर निवडकर्त्यांचे वेतन देखील वार्षिक 90 लाख रुपयांवरून वाढवले जाईल. आगरकर यांच्या निवड समितीमध्ये शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि एस शरथ यांचा समावेश आहे.
अजित आगरकर यांच्या समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघाची निवड केली. मुख्य निवडकर्ता म्हणून सामील होण्यापूर्वी आगरकर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते. त्याआधी त्यांनी मुंबईच्या वरिष्ठ संघाचे मुख्य निवडकर्ता पदही भूषवले होते. तसेच पहिली टीम इंडिया विंडीजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर टी-20 मालिका खेळवली जाईल. (हे देखील वाचा: MS Dhoni 42 Birthday Special: एमएस धोनी च्या 42 व्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांनी उभारलं 52 फीट उंच कट आऊट!)
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीप), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार