IND vs ENG 2nd Test 2025: दुसऱ्या कसोटीत सामन्यात बुमराहसह 'हे' 3 खेळाडू होऊ शकतात बाहेर, टीम इंडियामध्ये मोठे बदल निश्चित?

2 जुलैपासून एजबॅस्टन (Edgbaston), बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहसह तीन प्रमुख खेळाडूंना प्लेइंग-11 मधून वगळलं जाऊ शकतं.

IND vs ENG 2nd Test 2025: दुसऱ्या कसोटीत सामन्यात बुमराहसह 'हे' 3 खेळाडू होऊ शकतात बाहेर, टीम इंडियामध्ये मोठे बदल निश्चित?
Team India (Photo Credit- X)

India Natioanl Cricket Team vs England Natioanl Cricket Team: भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना (India Beat England 1st Test) करावा लागला. काही खेळाडूंनी प्रभावशाली प्रदर्शन केलं असलं, तरी काहींची कामगिरी निराशाजनक ठरली. आता 2 जुलैपासून एजबॅस्टन (Edgbaston), बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहसह तीन प्रमुख खेळाडूंना प्लेइंग-11 मधून वगळलं जाऊ शकतं. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: जसप्रीत बुमराहशिवाय भारताचं गोलंदाजी आक्रमण कसं असेल? कोच गंभीर कोणत्या नावांवर करणार शिक्कामोर्तब?)

1. जसप्रीत बुमराह – वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती?

जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी टिपले. त्याने 44 षटके टाकली आणि भारताचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. मात्र त्याच्या वर्कलोडचा विचार करता, दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी कसोट्यांसाठी त्याला ताजेतवाने ठेवणं हे संघासाठी महत्त्वाचं ठरेल.

2. शार्दुल ठाकूर – कामगिरी निराशाजनक

ऑलराउंडर शार्दुल ठाकूरचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पहिल्या कसोटीत त्याने फक्त 5 धावा केल्या आणि गोलंदाजीत केवळ २ बळी मिळवले. फलंदाजी किंवा गोलंदाजी दोन्ही क्षेत्रांमध्ये तो प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी अधिक प्रभावी पर्याय संघात येऊ शकतो.

3. रवींद्र जडेजा – अनुभव असूनही प्रभाव कमी

अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती. त्याने पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 25 धावा केल्या. गोलंदाजीत त्याला फक्त एक विकेट मिळाली. परिस्थिती पाहता, कुलदीप यादवसारख्या फॉर्मात असलेल्या फिरकी गोलंदाजाला संधी मिळू शकते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).