Chris Silverwood Resigns: ख्रिस सिल्व्हरवुड यांच्याकडून श्रीलंका पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वैयक्तिक कारणास्तव सोडले पद
श्रीलंका पुरूष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी वैयक्तिक कारणास्तव त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे.
Chris Silverwood Resigns: श्रीलंका पुरूष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे. 2022मध्ये त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाची जबाबदारी स्वीकारली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होते. 'आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असणे म्हणजे प्रियजनांपासून लांब राहणे. कुटुंबासोबत मोठ्या चर्चेनंतर जड अंतःकरणाने, मला असे वाटते की आता माझ्यासाठी घरी परतण्याची आणि चांगला वेळ घालवण्याची वेळ आहे,' श्रीलंका क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सिल्व्हरवुड म्हणाले. (हेही वाचा:Rohit Sharma's Epic Reply To Inzamam: 'कधी-कधी डोके वापरणेही गरजेचे'; इंझमाम उल हकच्या बॉल-टेम्परिंग आरोपांवर रोहित शर्माचे बेधडक उत्तर)
'मी श्रीलंकेत असताना मला पाठिंबा दिल्याबद्दल मी खेळाडू, प्रशिक्षक, बॅकरूम स्टाफ आणि SLC चे व्यवस्थापन यांचे आभार मानतो. तुमच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही यश शक्य नव्हते. श्रीलंका क्रिकेटचा भाग बनणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. अनेक गोड आठवणी घेऊन जात आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.
सिल्व्हरवुडयांनी 2022 मध्ये श्रीलंकेला T20 आशिया चषक जिंकण्यास मदत केली. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकन संघाने 2023 मध्ये 50 षटकांच्या आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. संघाने देशांतर्गत आणि परदेशात अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या. यापैकी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिका विजय आणि बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिकांत विजय मिळवला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)