ब्राझील फुटबॉल संघातील स्टार खेळाडू नेमार वर दारूच्या नशेत बलात्कार केल्याचा आरोप
तर हे आरोप खोटे आहेत अशी प्रतिक्रिया नेमारच्या वडिलांनी दिली आहे.
ब्राझील (Brazil) फुटबॉल संघातील स्टार खेळाडू नेमार ज्युनिअर (Neymar Jr) याच्यावर दारूच्या नशेत पॅरिस (Paris) मधील एका हॉटेलमध्ये महिलेचा बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात येत आहे.तर ही महिला खोट बोलत असून हा सगळा पब्लिसिटी मिळवून नेमारला गोत्यात आणण्यासाठी केलेला कट असल्याचे त्याचे वडील व हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. ही महिला ब्राझीलची मूळ रहिवाशी असून ती काही दिवसांपासून इंस्टाग्रामच्या माध्यमातून नेमारच्या संपर्कात आली होती. पॅरिसमधील हॉटेलमध्ये भेटल्यावर नेमारने तिला मारहाण करत बलात्कार केला अशी तक्रार तिने साओ पाउलो पोलीस स्थानकात केली आहे. दरम्यान हे प्रकरण नाजूक असल्याने पोलिसांनी महिलेचे नाव व या अन्य माहिती देण्यापासून नकार दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आपण नेमारशी इंस्टाग्राम वरून जोडले गेलो होतो असे या महिलेने सांगितले. ऑनलाईन चॅटिंग नंतर नेमार ने आपल्याला पॅरिसला येण्याचे आमंत्रण दिले. यानुसार गॅलो म्ह्णून दुसऱ्या फुटबॉल खेळाडूने आपले विमानाचे तिकीट देखील बुक करून दिले होते. फ्रान्सला पोहचताच नेमारने आपल्याला एका बड्या हॉटेलमध्ये थांबायला सांगितले, काही वेळाने नेमार दारू पिऊन नशिल्या अवस्थेत हॉटेलच्या रूममध्ये आला.त्यानंतर थोड्यावेळ गप्पा मारल्यावर आम्ही जवळ आलो पण एवढ्यावरच न थांबता नेमार आक्रमक होऊन आपल्याला आवेशात मारहाण करू लागला व नंतर त्याने आपल्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला अशी तक्रार या महिलेने केली आहे.
दरम्यान ही महिला केवळ नेमारला ब्लॅकमेल करण्यासाठी हा खोटा आरोप करत आहे असे म्हणत तिचे आणि नेमारचे चॅट्स देखील माध्यमांना दाखवण्याची तयारी नेमारच्या वडिलांनी दर्शवली आहे.अभिनेता करण ओबेरॉय 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, एका ज्योतिष महिलेवर बलात्कार केला होता आरोप
हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी ही महिला पुन्हा आपल्या घरी ब्राझील ला परतली. या घटनेमुळे आपण घाबरून पॅरिसमध्ये असताना पोलिसांकडे तक्रार केली नाही असे तिने म्हंटले आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यावर मगच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. नेमार सध्या ब्राझीलमध्ये असून पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये खेळण्याची तयारी करत आहे.