Arjun Tendulkar Century: पदार्पणाच्या सामन्यात शतक केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव, दिनेश कार्तिकनेही केले तोंडभर कौतुक

त्याने आपल्या पदार्पणाच्या शतकासह हे सांगितले की त्याने फलंदाजीत खूप मेहनत घेतली आहे.

अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने गोव्याकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने राजस्थानविरुद्ध 120 धावांचे शतक झळकावले. या शतकासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. अर्जुनपूर्वी त्याच्या सचिननेही रणजी पदार्पणात शतक झळकावले होते.

दुसरीकडे, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अर्जुनच्या शतकावर मोठे वक्तव्य केले आहे. अर्जुनच्या या खेळीचे दिनेशने कौतुक केले आहे. दिनेश कार्तिकने अर्जुनचे जबरदस्त कौतुक केले. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करताना क्रिकबझला सांगितले की, 'आम्ही अर्जुनला गोलंदाजीसाठी ओळखतो जो थोडी फलंदाजी जाणतो. त्याने आपल्या पदार्पणाच्या शतकासह हे सांगितले की त्याने फलंदाजीत खूप मेहनत घेतली आहे. हे शतक त्याच्यासाठी खास आहे. गोलंदाजीनंतर ही कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याच्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. मी त्याला इंग्लंडमध्ये सराव करताना पाहिले आहे'. हेही वाचा Arjun Tendulkar Century: पहिल्या रणजी करंडक शतक ठोकल्यानंतर साराने अर्जुन तेंडुलकरचे केले कौतुक, पहा पोस्ट

राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफी पदार्पणात अर्जुनला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने 207 चेंडूत 120 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत 16 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर अर्जुनने दाखवून दिले आहे की तो चेंडूसोबतच बॅटनेही संघासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघात स्थान न मिळाल्याने या रणजी हंगामात गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णयही त्याच्यासाठी चांगलाच ठरला आणि त्याने पदार्पणातच राजस्थानविरुद्ध शतक झळकावले.