IND vs ENG Test: सामना हरल्यानंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का, 'हा' महत्वाचा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
जडेजाला गुडघ्याला दुखापत झाली आणि मॅचनंतर त्याला तपासणीसाठी लीड्सच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाला (Team India) इंग्लंडकडून (England) लीड्स कसोटीत दारूण पराभव स्वीकारावा लागला. जो रूटच्या (Joe Root) नेतृत्वाखालील इंग्लडने चौथ्या दिवशीच भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. या निकालामुळे पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली असून भारतीय संघाला आता 2 सप्टेंबरपासून लंडनमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत (Test Match) पुनरागमन करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण टीम इंडियासाठी लीड्समधील पराभव केवळ त्रासदायक नव्हता, तर आता संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचा (All-rounder Ravindra Jadeja) फिटनेस देखील चिंतेचा विषय बनत आहे. जडेजाला गुडघ्याला दुखापत झाली आणि मॅचनंतर त्याला तपासणीसाठी लीड्सच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर नॉट अ गुड प्लेस टू बी अॅट कॅप्शनसह स्वतःचे एक चित्र, हॉस्पिटलचे कपडे परिधान केलेला फोटो शेअर केला होता.
लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही जडेजा सामन्यात कायम राहिला. त्याने शनिवारी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना गोलंदाजी केली आणि काही महत्त्वपूर्ण धावा केल्या. मात्र संघाच्या पराभवानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे दुखापतीची तीव्रता जाणून घेण्यासाठी त्याची स्कॅनिंग करण्यात आली. भारतीय संघ 30 ऑगस्ट रोजी लंडनला रवाना होणार आहे. जर स्कॅन अहवालात काही महत्त्वाचे उघड झाले नाही तर जडेजा संघासोबत असेल.
जडेजाने सामन्याच्या पहिल्या डावात 32 षटके टाकली आणि 2 बळीही घेतले. दुखापतग्रस्त असताना त्याने यापैकी बहुतेक षटके दुसऱ्या दिवशीच टाकली. सध्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर त्याच्या चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधून त्याचा फोटोही पोस्ट केला. जडेजाने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 30 धावा करून संघाचे पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला.
या दौऱ्यात भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. सर्वप्रथम, सलामीवीर शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान जखमी झाला होता. यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. त्याच वेळी, नॉटिंघम कसोटीपूर्वी, मयंक अग्रवाल देखील नेट सत्रादरम्यान मोहम्मद सिराजच्या बाउन्सरवर जखमी झाला होता. तसेच पहिल्या कसोटीतून बाहेर पडला होता. त्याची प्रकृती सध्या बरी आहे.