Neeraj Chopra च्या ब्रॅंड व्हॅल्यू मध्ये 377 कोटींपर्यंत वाढ होणार? मोठमोठ्या क्रिकेटपटूंना मागे टाकणार

यामुळे, त्याच्या ब्रॅंड व्हॅल्यु, नेट वर्थ आणि एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज चोप्राकडे आणखी 6 ते 8 ब्रॅंड्सची वाढ होण्याची शक्यता आहे.

Neeraj Chopra | (Photo Credit - X)

Neeraj Chopra Pay Rise:  Paris Olympics 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने(Neeraj Chopra) रौप्य पदक पटकावत सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया केली. नीरज चोप्रा सुवर्ण पदक पटकवण्यात अपयशी ठरला असला तरी, रौप्य पदक पटकावल्यामुळे त्याच्या ब्रॅंड व्हॅल्यु, नेट वर्थ आणि एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता( Neeraj Chopra Pay Rise) आहे. मनी कंट्रोलने जाहिर केलेल्या अहवालानुसार, नीरज चोप्राच्या एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये सध्या 24 ब्रॅड्सचे प्रमोशन करण्याची जबाबदारी आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा:Virat Kohli ला ब्रँड व्हॅल्यूमध्ये Neeraj Chopra देणार टक्कर, ऑलिम्पिक ‘गोल्डन बॉय’ 10 पटीने महागला; पाहा कोणाची आहे किती Brand Value)

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज चोप्राकडे आणखी 6 ते 8 ब्रॅंड्सची वाढ होण्याची शक्यता आहे. नीरज चोप्रा सध्या त्याच्या सर्व एंडोर्समेंटसाठी वर्षाला सुमारे 3 कोटी आकारतो. मात्र आता त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जर त्याने 6 ते 8 नवीन ब्रॅंड्सशी करार केला, तर तो हिंदुस्थानातील अनेक क्रिकेटपटूंना मागे टाकेल. (हेही वाचा: Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल)

पोस्ट पहा:

सध्या नीरज चोप्राची ब्रॅंड व्हॅल्यू 248 कोटींपर्यंत आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जर त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 50 टक्क्यांनी वाढली तर ती 377 कोटी रुपयांपर्यंच पोहचू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif