'Zombie' Drug Crisis in US: 'झोम्बी'ची लागण झालेले नागरिक फिलाडेल्फिया शहराच्या रस्त्यावर? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नीटसे उभे न राहता येणाऱ्या आणि त्यामुळे रस्त्यावरच झोकांड्या देणाऱ्या नागरिकांचा यूएसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटीझन्सनी केलेल्या दाव्यानुसार, या सर्व लोकांना झोंबी व्हायरसची लागण झाली आहे.

नीटसे उभे न राहता येणाऱ्या आणि त्यामुळे रस्त्यावरच झोकांड्या देणाऱ्या नागरिकांचा यूएसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटीझन्सनी केलेल्या दाव्यानुसार, या सर्व लोकांना झोंबी व्हायरसची लागण झाली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, अनेक तरुण, तरुणी, महिला, पुरुष हे भररस्त्यात झोकांड्या खात आहेत. तोंडाचा आ वासून उभे आहेत. प्रदीर्घ काळ ते एकाच अवस्थेत असतात. काहींचे शरीरावर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण असते. असे लोक उभे राहण्याचा प्रयत्न करतात पण मध्येच त्यांचा तोल जातो आणि ते भेलकांडतात. काही मात्र रस्त्यावर, कडेला निपचीत पडून असतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आपणही तो पाहू शकता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now