Walt Disney Layoffs: वॉल्ट डिस्नेमध्ये होणार पुन्हा एकदा कर्मचारी कपात; हजारो लोकांच्या नोकऱ्या जाणार- Reuters

अहवालानुसार एका झटक्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना वॉल्ट डिस्नेमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

Walt Disney

वॉल्ट डिस्ने कंपनीत पुन्हा एकदा नोकर कपात होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, अमेरिकन टेक आणि एंटरटेनमेंट कंपनीमध्ये दुसऱ्या फेरीच्या कर्मचारी कपातीचे नियोजन सुरू आहे. अशा परिस्थितीत हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका वाढला आहे. कंपनी सुमारे 7,000 पदे रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीमुळे अनेक हजार कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. अहवालानुसार एका झटक्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना वॉल्ट डिस्नेमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. वॉल्ट डिस्नेने याआधी मोठी कर्मचारी कपात केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आता कंपनी 4,000 लोकांना कामावरून काढून टाकू शकते. कर्मचारी कपातीच्या दुसऱ्या फेरीशी संबंधित अंतर्गत मेमो देखील कंपनीमध्ये शेअर केला गेला आहे. (हेही वाचा: HCL Technologies: टाळेबंद आणि वेतन कपातीच्या दरम्यान HCL ने आपल्या 85 टक्के कर्मचार्‍यांना देणार परिवर्तनीय वेतन)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement