Video- Singer Dies During Live Performance: ब्राझिलियन गॉस्पेल गायक Pedro Henrique चे हृदयविकाराचा झटक्याने निधन; स्टेजवरच गाताना कोसळला (Watch)
पेड्रो हेन्रिक हा त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जायचा. तो गॉस्पेल संगीतामधील एक उगवता तारा होता.
Singer Dies During Live Performance: ब्राझीलमधून एका गायकाच्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फेरा डी सांताना, बहिया येथे 30 वर्षीय गॉस्पेल गायक पेड्रो हेन्रिक याचे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. या प्रतिभावान कलाकाराला स्टेजवर गाताना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्याचा मृत्य झाला. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पेड्रो हेन्रिक हा त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जायचा. तो गॉस्पेल संगीतामधील एक उगवता तारा होता. त्याच्या मागे त्याचे कुटुंब, पत्नी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. पेड्रो हेन्रिकचे बाहिया येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्याची मुलगी 19 तारखेला तिच्या आयुष्याचा दुसरा महिना साजरा करणार होती. पेड्रो हेन्रिकच्या जाण्याने त्याचे सहकारी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा: Shreyas Talpade Gets Heart Attack: लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; झाली अँजिओप्लास्टी- Reports)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)