US Opens Visa Appointments for Indians: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांसाठी मोठी बातमी; US दूतावासाकडून अतिरिक्त 250,000 व्हिसा अपॉइंटमेंट्सची घोषणा
भारतातील यूएस दूतावासाने भारतीय प्रवाशांसाठी अतिरिक्त 250,000 व्हिसासाठी अपॉइंटमेंट्सची घोषणा केली आहे.
US Opens Visa Appointments for Indian Travellers: दरवर्षी भारतातील लोक मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कामांसाठी अमेरिकेत जातात. मात्र अमेरिकेचा व्हिसा मिळणे ही मोठी गोष्ट मानली जाते. त्यामुळे अनेकांना व्हिसा मिळू शकत नाही. आता अमेरिकेने या लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. भारतातील यूएस दूतावासाने भारतीय प्रवाशांसाठी अतिरिक्त 250,000 व्हिसासाठी अपॉइंटमेंट्सची घोषणा केली आहे. भारतातील यूएस दूतावासाने पर्यटक, कुशल कामगार आणि विद्यार्थ्यांसह भारतीय प्रवाशांसाठी या अतिरिक्त 250,000 व्हिसा अपॉइंटमेंट्स उघडल्या आहेत. नुकतेच रिलीझ केलेले नवीन स्लॉट लाखो भारतीय अर्जदारांना वेळेवर मुलाखती घेण्यास मदत करतील. यामुळे लोकांना अमेरिकेत जाण्याची सोय होणार आहे. (हेही वाचा: Advisory for Indian Citizens: लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी, दूतावासाने तात्काळ मायदेशी परतण्याचे नागरिकांना केले आवाहन)
US Opens Visa Appointments for Indian Travellers:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)