US Horror: अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी खाल्ले, अंगावर 50 ठिकाणी आढळल्या चावल्याचा खुणा; कोर्टाने वडिलांना सुनावली 16 वर्षांची शिक्षा

जेव्हा पोलीस घरी पोहोचले तेव्हा बाळाच्या अंगावर अनेक ठिकाणी उंदीर चावल्याचा खुणा आढळल्या.

Representational Image (Photo Credits: File Image)

अमेरिकेच्या इंडियाना राज्यात राहणाऱ्या एका वडिलांना आपल्या 6 महिन्यांच्या मुलाचा योग्य पद्धतीने सांभाळ ण केल्याबद्दल, 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बाळाच्या शरीरावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदीर चावल्याच्या खुणा आढळल्या होत्या. त्यानंतर त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली व आता न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीने आपल्या बाळाला उंदरांसोबत ठेवले होते. मूल पाळणामध्ये झोपले होते आणि उंदीर त्याला जिवंत खात होते. मुलाच्या एका हाताचा तळवा आणि पाचही बोटांचे मांस उंदरांनी खाऊन टाकले होते. जेव्हा मूल अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले, तेव्हा या निष्काळजी वडिलांनी मदत मागितली. ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये घडली होती.

उंदराच्या चाव्याव्दारे मुलाचे शरीर ‘कायमचे विद्रूप’ झाले होते. डेव्हिड शोनाबॅमने आपल्या मुलाला पाळीव कुत्र्यासोबत ठेवले होते. सप्टेंबर 2024 मध्ये डेव्हिडला बाळाकडे दुर्लक्ष करणे आणि इतर तीन गंभीर आरोपांसाठी दोषी ठरविण्यात आले होते. आता 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्याला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुलाची आई, एंजल शोनबॉमलाही या महिन्याच्या अखेरीस शिक्षा सुनावण्यात येणार आहे. घरात तीन मुलांना उंदीर चावले होते. (हेही वाचा: Son Hit Mother With Bat: फोन हिसकावून घेतल्याच्या रागातून 10 वर्षांच्या मुलाचा आईवर बॅटने हल्ला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल)

कोर्टाने वडिलांना सुनावली 16 वर्षांची शिक्षा-