US Bus Hijacking: अटलांटामध्ये ट्रान्झिट बस हायजॅकचा थरार; गोळीबारात एक ठार, आरोपीला अटक (Watch Video)
यात दुर्दैवाने एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी 11 जून रोजी ही घटना घडली. पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने बसचा पाठलाग करत आरोपीला अटक केली आहे.
US Bus Hijacking: अटलांटा (Atlanta)येथे ग्विनेट काउंटी ट्रान्झिट बस(Transit Bus)च्या अपहरणाचा थरार पहायला मिळाला. यात दुर्दैवाने एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी 11 जून रोजी ही घटना घडली. पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने बसचा पाठलाग करत आरोपी जोसेफ ग्रियरला अटक केली आहे. बसच्या अपहरणाच्या या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. हायजॅक आणि आरोपीच्या अटकेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. चालकाच्या डोक्यावर बंदूक रोखत हायजॅकरने बसचे अपहरण केले होते. तयावेळी 17 प्रवासी बसमध्ये होते. जॉर्जिया(Georgia)च्या दोन काऊंटींमधून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. (हेही वाचा:Rare Tow Headed Snake Spotted in US Zoo:यूएसमधील प्राणिसंग्रहालयात आढळला दुर्मिळ दोन डोक्याचा साप,व्हिडिओ होतोय व्हायरल )
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)