संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून केले निलंबित; ठरावाच्या मसुद्याच्या बाजूने 93 देशांनी केले मतदान

एकूण 93 देशांनी मसुद्याच्या बाजूने मतदान केले, तर 24 देशांनी विरोधात मतदान केले

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

युक्रेनच्या बुचा येथे झालेल्या हत्याकांडानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने गुरुवारी रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित केले. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एकूण 93 देशांनी मसुद्याच्या बाजूने मतदान केले, तर 24 देशांनी विरोधात मतदान केले, तर भारतासह 58 देश गैरहजर राहिले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) मधून रशियाच्या निलंबनावर UNGA ने आज आपत्कालीन विशेष सत्र पुन्हा सुरू केले. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या दूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याची मागणी केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement