Earthquakes Near Japan Coast: जपानच्या किनार्याजवळ एकापाठोपाठ 6.5 व 5.0 तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के
संपूर्ण वर्षभर जपानमध्ये शक्तिशाली भूकंपांची मालिका सुरू असते. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
Earthquakes Near Japan Coast: युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार गुरुवारी जपानच्या किनारपट्टीजवळ 6.5 आणि 5.0 तीव्रतेचे दोन भूकंपाचे (Earthquakes) धक्के बसले. 6.5 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप दुपारी 2:45 वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू कुरिल बेटांच्या आग्नेय किनारपट्टीवर होता, त्यानंतर दुपारी 3:07 वाजता 5.0 तीव्रतेचा धक्का बसला. संपूर्ण वर्षभर जपानमध्ये शक्तिशाली भूकंपांची मालिका सुरू असते. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, 5 मे रोजी, जपानच्या पश्चिमेकडील इशिकावा प्रांतात 6.5 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे अनेक लोक जखमी झाले आणि अनेक इमारती कोसळल्या. फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्टमध्ये होक्काइडोच्या उत्तरेकडील बेटावरही शक्तिशाली भूकंप झाले. (हेही वाचा - Ukraine-Russia War: रशियावर युक्रेनचा मोठा हल्ला, रशियन लँडिंग जहाज नोवोचेरकास्कला लक्ष्य, क्रिमियन बंदर नष्ट)