Turkey and Syria Earthquake: तुर्किये आणि सीरियामधील भूकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या 11,000 च्या पुढे

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. यात विविध देशांतील ट्रेंड टीमचाही समावेश आहे.

Turkey and Syria Earthquake

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे झालेल्या विध्वंमधील मृतांची संख्या 11,000 च्या पुढे गेली आहे. 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढतच आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर अजूनही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. यात विविध देशांतील ट्रेंड टीमचाही समावेश आहे. भारत सरकारने एनडीआरएफची टीमही बचावासाठी पाठवली आहे. तसेच अमेरिका, चीनसह अनेक देशांकडून दोन्ही देशांना मदत केली जात आहे.

दरम्यान, तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, तुर्कीच्या नूरदगी शहरात हा भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 मोजली गेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now