Tornado in Dallas: जोरदार वाऱ्याने चक्क अमेरिकन एअरलाइन्सच्या 737-800 विमानाला विमानतळावरील गेटपासून दूर ढकलले, व्हिडिओ व्हायरल (Watch)
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसादरम्यान ही घटना घडली, ज्यामुळे उड्डाण सुरक्षा आणि ऑपरेशनल आव्हानांबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
Tornado in Dallas: अमेरिकेमधील अनेक भागांना सध्या मुसळधार पाऊस, चक्रीवादळ व विजांचा कडकडातचा इशारा देण्यात आला. या हवामानाचा परिणाम विमानसेवेवरही होताना दिसत आहे. डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्सचे 737-800 विमान त्याच्या गेटपासून ढकलले गेले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसादरम्यान ही घटना घडली, ज्यामुळे उड्डाण सुरक्षा आणि ऑपरेशनल आव्हानांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. विमानतळ प्राधिकरणाने कोणतीही दुखापत झाल्याची नोंद केलेली नाही. विमान कंपनी सध्या प्रवाशांसाठी आणि क्रूसाठी पुढील पावले ठरवण्यासाठी परिस्थितीचे मूल्यांकन करत आहे. (हेही वाचा: US Storm Death: अमेरिकेत चक्रीवादळातील मृतांचा आकडा 20 वर; टेक्सास, आर्कान्सास, ओक्लाहोमा आणि केंटकी राज्यांचा फटका)
पहा व्हिडिओ-
JUST IN - American Airlines Boeing 737-800 pushed away from its gate at Dallas International Airport due to severe weather.
— Insider Paper (@TheInsiderPaper) May 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2024 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

