TikTok fined: लहान मुलांच्या डाटाचा गैरवापर केल्या प्रकरणी टिक टॉकला 12.7 मिलियन युरोचा दंड

हे उल्लंघन मे 2018 ते जुलै 2020 दरम्यान झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात टिक टॉकला देखील सुचना करण्यात आली आहे.

TikTok (PC - pixabay)

व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिक टॉकच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. काही दिवसांपुर्वी अमेरिकेसह अनेक देशांनी टिक टॉकचा सरकारी उपकरणामधील वापरावर बंदी टाकली होती. आता पुन्हा एकदा टिक टॉकवर मोठा दंड लावण्यत आला आहे. मुलांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्यामुळे टिकटॉकला 12.7 मिलियन युरोचा दंड हा ठोठावण्यात आला आहे. युनायटेड किंगडमच्या डेटा वॉचडॉगने ही माहिती दिली आहे. हे उल्लंघन मे 2018 ते जुलै 2020 दरम्यान झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात टिक टॉकला देखील सुचना करण्यात आली आहे.

13 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलाचा कोणतीही खासगी माहिती ही त्याच्या पालकाच्या संमती शिवाय घेऊ नये असा युनायटेड किंगडममध्ये कायदा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement