Thailand Recognises Same-Sex Marriage: थायलंड सरकारने दिली समलिंगी विवाहाला मान्यता; विवाह समानता विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
नागरी संहितेत बदल केल्यानंतर थायलंडमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर होईल.
समलिंगी विवाहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. समलिंगी विवाहाबाबत भारतात इतका संघर्ष सुरू असताना, थायलंडच्या सरकारने समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे. थायलंड सरकारने नागरी संहितेत बदल करण्याचे मान्य केले आहे. नागरी संहितेत बदल केल्यानंतर थायलंडमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर होईल. थायलंड सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी ही माहिती दिली. देशाच्या सरकारने समलैंगिक विवाह विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्रिमंडळाने दिली. समलिंगी विवाह विधेयकाचा मसुदा पुढील महिन्यात खासदारांसमोर मांडला जाऊ शकतो, असे मंत्रिमंडळाने सांगितले. थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सांगितले की, 12 डिसेंबर रोजी हे विधेयक खासदारांसमोर मांडले जाण्याची अपेक्षा आहे. जर हे विधेयक संसदेने मंजूर केले आणि त्याला राजाची संमती मिळाल्यास, तैवान आणि नेपाळसह थायलंड हा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आणखी एक आशियाई देश बनेल. LGBTQ+ अनुकूल देश म्हणून प्रसिद्ध असूनही, थायलंडने विवाह समानता कायदे मंजूर करण्यासाठी संघर्ष केला आहे. संसदेने गेल्या वर्षी विवाह समानता किंवा नागरी संघटनांना परवानगी देण्यासाठी अनेक कायदेशीर सुधारणांवर चर्चा केली. (हेही वाचा: Same-Sex Marriages: सर्वोच्च न्यायालयातील समलैंगिक विवाह याचिकांना DCPCR चा पाठींबा; म्हटले- 'समलिंगी कुटुंबे सामान्य आहेत याची सरकारने जागरूकता निर्माण करावी')
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)