Ted Baker Layoffs: ब्रिटनला मंदीचा फटका! लक्झरी कपडे कंपनी टेड बेकरने 15 स्टोअर बंद करण्याची केली घोषणा

आणि सुमारे 245 जणांना नोकरीवरून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Ted Baker Layoffs: 8 एप्रिल (सोमवार) रोजी, ब्रिटिश लक्झरी कपड्यांची कंपनी टेड बेकरने ब्रिटनमधील 15 स्टोअर बंद करण्याची घोषणा केली आहे. आणि सुमारे 245 जणांना नोकरीवरून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले. इनसाइडर पेपरच्या अहवालानुसार, 11 टेड बेकर दुकाने 19 एप्रिलपर्यंत बंद होतील. टेड बेकर ब्रँडचे व्यवस्थापन करणारी होल्डिंग कंपनी नो ऑर्डिनरी डिझायनर लेबल (एनओडीएल) चे संयुक्त प्रशासक टेनेओ यांनी या बातमीची पुष्टी केली. अधिकृत निवेदनात, टेनेओ म्हणाले, " ब्रँडच्या मुख्यालयातील 120 स्टोअर बंद होणार आहे".

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)