Sri Lanka : राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळण्यासाठी प्रवासाची सुविधा भारताकडून पुरवण्यात आलेली नाही : श्रीलंका भारतीय उच्चायुक्तालय

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने स्पष्ट केलं आहे की राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा भारताकडून पुरवण्यात आलेली नाही.

श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान (Sri Lanka PMO) कार्यालयाने नुकतीच दिली आहे. तरी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळ काढण्यासाठी प्रवासाची सुविधा भारताकडून पुरवण्यात आली आहे असं काही मिडीया रिपोर्ट मधून पुठे आलं होतं. पण या सगळ्या मिडीया रिपोर्टसचं खंडण करत श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने स्पष्ट केलं आहे की राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा भारताकडून पुरवण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement