Shocking! सौदी येथील महिलेला ट्विट रिट्विट करणे पडले महागात; न्यायालयाने सुनावली 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

34 वर्षीय सलमा ही दोन मुलांची आई आहे. इंटरनेट वेबसाइट वापरल्याबद्दल तिला यापूर्वी 3 वर्षांची शिक्षा झाली होती.

Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

ट्विटर वापरल्याप्रकरणी सौदीतील एका महिलेला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लीड्स विद्यापीठात शिकणारी सौदीची विद्यार्थिनी सलमा अल-शहाब सुट्टीवर घरी आली होती आणि त्यावेळी तिला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तिचे ट्विटरवर खाते असून तिने असंतुष्ट लोक आणि कार्यकर्त्यांना फॉलो करून त्यांचे ट्विट रिट्विट केल्याचा आरोप आहे. सौदीच्या विशेष दहशतवादी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

34 वर्षीय सलमा ही दोन मुलांची आई आहे. इंटरनेट वेबसाइट वापरल्याबद्दल तिला यापूर्वी 3 वर्षांची शिक्षा झाली होती. सार्वजनिक अशांतता निर्माण केल्याचा आणि नागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. आता 34 वर्षांच्या शिक्षेसह तिच्या प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे. सलमावर नवे आरोपही लावण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की, ती तिच्या ट्विटर खात्यांद्वारे सार्वजनिक अशांतता निर्माण करू इच्छिणाऱ्यांना मदत करत होती. याप्रकरणी शहाब नव्या अपीलाची मागणी करू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now