Firing in Pakistan School: पाकिस्तानमधील शाळेत गोळीबार; पारचिनारमध्ये 7 शिक्षकांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुन्नी दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण अफगाण सीमेला लागून आहे.
Firing in Pakistan School: पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाक-अफगाण सीमेजवळील पारचिनार येथील शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सात शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सशस्त्र लोकांनी स्टाफ रूममध्ये गोळीबार केला. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मृत्युमुखी पडलेल्या सात शिक्षकांपैकी चार शिया समुदायाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुन्नी दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण अफगाण सीमेला लागून आहे. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. (हेही वाचा - Inflation Rate: पाकिस्तानच्या महागाईने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; पोहोचला 36.4 टक्क्यांच्या उच्चांकावर, श्रीलंकेला टाकले मागे)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)