Russian Military Plane Crashes in Ivanovo: इव्हानोव्होमध्ये रशियन लष्करी विमान कोसळले, इंजिनला लागली आग; सर्व 15 प्रवासी ठार (Video)
विमानातील किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनला आग लागली, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
Russian Military Plane Crashes: नुकतेच रशियन लष्कराचे आणखी एक विमान अपघाताचे बळी ठरले आहे. चार इंजिन असलेल्या या मालवाहू विमानाच्या एका इंजिनला आग लागली. यानंतर विमान कोसळले. विमानातील सर्वजण ठार झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियन हवाई दलाचे मोठे नुकसान होत आहे. महिनाभरापूर्वीही रशियन हवाई दलाच्या एका मोठ्या लष्करी विमानाला अपघात झाला होता. या विमानात युक्रेनचे युद्धकैदी होते.
आता आज ज्या विमानाचा अपघात झाल्याची नोंद झाली ते विमान मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो भागात पडले. अपघात झालेले हे IL-76 विमान होते. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. विमानातील किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनला आग लागली, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. (हेही वाचा: Indian Woman Murdered in Australia: भारतीय महिलेची ऑस्टेलियात हत्या, मृतदेह कचराकुंडीत आढळला)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)