Russia-Ukraine War: रशियाकडून Nuclear Attack ची जोरदार तयारी? युक्रेनच्या फ्रंट लाईनकडे जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या ताफ्याचा व्हिडीओ व्हायरल (Watch)
रशियाच्या आण्विक सैन्यासाठी उपकरणांची वाहतूक करणाऱ्या एका रेल्वेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 7 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. अलीकडेच युक्रेनने रशियाचे मोठे नुकसान कसून, त्यांचे अनेक भूभाग परत घेतले आहेत. अशा स्थितीत आता रशियाकडून अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढला आहे. यामागे एक कारण म्हणजे रशियाकडे सैन्याचा तुटवडा आहे. म्हणूनच आता रशिया छोट्या अण्वस्त्रांचा वापर करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशियाच्या पश्चिम सीमेला लागून असलेल्या जवळपास सर्व भागात 1588 अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.
आता असे एक फुटेज समोर आले आहे ज्याने पश्चिमी देशांच्या चिंता वाढवल्या आहेत. रशियाच्या आण्विक सैन्यासाठी उपकरणांची वाहतूक करणाऱ्या एका रेल्वेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मध्य रशियामधील एका अज्ञात ठिकाणी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, वाहने आणि उपकरणांनी भरलेली ट्रेन युक्रेनच्या फ्रंट लाईनकडे जात असल्याचे दिसत आहे. संरक्षण विश्लेषक कोनराड मुझिका यांनी द सनला सांगितले की, ही ट्रेन एका युनिटशी जोडलेली आहे जी अण्वस्त्रांसाठी डझनभर केंद्रीय स्टोरेज सुविधा चालवते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)