Barack Obama Entry Bans In Russia: रशियाने माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह 500 अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर बंदी, जाणून घ्या कारण

दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनही हार मानायला तयार नाही. त्याच वेळी, रशिया मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे युक्रेनची स्थिती बिकट झाली आहे.

Barak Obama

अमेरिकेने रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवास करणाऱ्या मीडियाला व्हिसा नाकारला होता. अमेरिकेच्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या रशियाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासह 500 जणांना रशियात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. रशियाने जारी केलेल्या निवेदनात हे सांगण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या एक वर्षापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनही हार मानायला तयार नाही. त्याच वेळी, रशिया मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे युक्रेनची स्थिती बिकट झाली आहे.

पाहा ट्विट -