Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: रफाहमधील हल्ल्यांविरोधात तीव्र निदर्शने; संतप्त जमावाने मेक्सिकोतील इस्रायली दूतावासाला लावली आग (Watch Video)

मंगळवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाच्या बाहेर सुमारे 200 लोक ‘रफाहसाठी त्वरित कारवाई’ निदर्शनात सामील झाले.

Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico

Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: गाझामधील रफाह येथे इस्रायली हल्ल्यांविरोधातील निदर्शने तीव्र होत आहेत. जगभरात अनेक लोक इस्रायलच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. अशात आता संतप्त जमावाने बुधवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाला आग लावली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पॅलेस्टाईन समर्थक (नरसंहार विरोधी) निदर्शकांनी मेक्सिकोमधील इस्रायली दूतावास पेटवला. मंगळवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाच्या बाहेर सुमारे 200 लोक ‘रफाहसाठी त्वरित कारवाई’ निदर्शनात सामील झाले. त्यावेळी त्यांनी दूतावास पेटवून दिला. मंगळवारी इस्त्रायली गोळीबार आणि हवाई हल्ले यांनी रफाहच्या पश्चिमेकडील अल-मवासी येथील निर्वासित छावणीला लक्ष्य केले, परिणामी अनेक लोकांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान रोहित शर्माची पत्नी Ritika Sajdeh ने शेअर केली 'All Eyes on Rafah' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी इंस्टाग्राम स्टोरी; 'खाते हॅक झाले का?' चाहत्यांचा प्रश्न)

पहा व्हिडिओ- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)