PM Modi Unveils Bust of Mahatma Gandhi: जापानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण

हिरोशिमा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यामुळे अहिंसेचा विचार पुढे जाईल - मोदी

PM Modi Unveils Bust of Mahatma Gandhi: जापानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण
PM Narendra Modi unveils Bust of Mahatma Gandhi

G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जपानला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी हिरोशिमा (Hiroshima) येथे महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याचे अनावरण केले. अनावरणानंतर त्यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. अनावरणानंतर पीएम मोदी म्हणाले की, आजही 'हिरोशिमा' हा शब्द ऐकून जग घाबरते. ते म्हणाले, "जी 7 शिखर परिषदेसाठी माझ्या जपान भेटीदरम्यान मला महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. हिरोशिमा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यामुळे अहिंसेचा विचार पुढे जाईल."

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).