PM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील
ते क्वॉड कंट्रीज समिट आणि यूएन जनरल असेंब्लीच्या बैठकीला उपस्थित राहतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर रोजी अमेरिकेला रवाना होतील. ते क्वॉड कंट्रीज समिट आणि यूएन जनरल असेंब्लीच्या बैठकीला उपस्थित राहतील. सोमवारी व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत द्विपक्षीय भेटीचे नियोजन केले आहे. 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बिडेन यांची पहिली थेट बैठक होणार आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अध्यक्ष बिडेन यांनी क्वाड देशांच्या नेत्यांची पहिली थेट बैठक आयोजित केली आहे. पंतप्रधान मोदींशिवाय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगाही उपस्थित राहतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)