PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च 'Order of the Nile' राज्य सन्मान; राष्ट्रपती Abdel Fattah al-Sisi यांनी केले सन्मानित
26 वर्षात भारतीय पंतप्रधानांची इजिप्तला झालेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कैरो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. 'ऑर्डर ऑफ द नाईल' हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. शनिवारी इजिप्तच्या राज्य दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कैरो येथील अल-हकीम मशिदीला भेट दिली. इजिप्तचे राष्ट्राध्यक्षही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी इजिप्तमधील कैरो येथील हेलिओपोलिस वॉर मेमोरियलला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी, त्यांनी इजिप्त आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली आणि शीर्ष कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला भेट देत आहेत. 26 वर्षात भारतीय पंतप्रधानांची इजिप्तला झालेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. (हेही वाचा: Egypt- PM Modi In Al-Hakim Mosque: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौरे येथील अल हकीम मशिदीला दिली भेट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)