Plane Crash in Poland: उत्तर पोलंडमध्ये प्रशिक्षणादरम्यान फायटर जेट झाले क्रॅश; हवेत घेतला पेट, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)
दुर्दैवाने, विमानातील पोलिश हवाई दलाचा पायलट बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही.
Plane Crash in Poland: शुक्रवारी उत्तर पोलंडमध्ये प्रशिक्षण उड्डाणदरम्यान एक लढाऊ विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. ग्डिनिया एअर बेस (Gdynia Air Base) येथे हा अपघात घडला. ग्डिनिया हे पोलंडच्या बाल्टिक किनाऱ्यावरील एक बंदर शहर आहे. दुर्दैवाने, विमानातील पोलिश हवाई दलाचा पायलट बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. विमान कोसळल्यानंतर ताबडतोब आपत्कालीन सेवा मदतीसाठी धावल्या. या अपघाताचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे, ज्यात विमान क्रॅश होऊन पेट घेताना दिसत आहे. अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Baba Vanga's Prophecies: 'जगाचा होणार विनाश' द नॉस्ट्रॅडॅमस ऑफ द बाल्कन अर्थात बाबा वेंगा यांची भविष्यवाणी, घ्या जाणून)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)