Pervez Musharraf Death Hoax: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ जिवंत; प्रकृती गंभीर, उपचार सुरु

परवेझ मुशर्रफ यांना हृदय आणि इतर आजारांमुळे दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

पाकड्यांना भीती, भारत दुप्पटीने परमाणू बॉम्ब हल्ला करुन आपल्याला संपवेल- परवेज मुशर्रफ (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांचा दुबईमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार परवेझ मुशर्रफ हे जिवंत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.मुशर्रफ यांची प्रकृती गेले काही दिवसापासून चिंताजनक होती. त्यांना आज व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परवेझ मुशर्रफ यांना हृदय आणि इतर आजारांमुळे दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now